वणी :
शहरातील श्री हनुमान लाठी आखाड्याला ७१ वर्ष झालेल्या निमित्ताने दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजीत प्राचीन युद्धकला प्रदर्शन व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात बोलतांना प्राचीन युध्दकला साधनांचा परिचय आजच्या पिढीला होणे गरजेचे असुन संरक्षणाला आखाड्यात मिळणारे प्रशिक्षण काळाची गरज आहे. ही भागविणारी वणीतील चार आखाडे हे वणीचे सांस्कृतिक वैभव आहे असे प्रतिपादन उद्घाटक म्हणून आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. जेष्ठ सामाजिक नेते विजयबाबू चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे साहेब, संचालक,म.रा.कापूस उत्पादक पणन महासंघ मुंबई संजय खाडे, नायब तहसिलदार विवेक पांडे, टिकाराम कोगरे, प्रा. दिलीप मालेकर, राजाभाऊ बिलोरिया, राजाभाऊ पाग्रडकर, संभा वाघमारे, सुधाकर गारघाटे, दिगांबर गोहोकार, मटन झुंजपत्लीवार, हरिष पाते, अनंत मोहितकर रमेश सुंकूरवार, विजय मुकेवार, नारायण गोडे, उपस्थीत होते.
आजच्या काळात मुली, स्त्रीयांवर होणान्या लैंगिक अत्याचाराचा मुकाबला करणेसाठी युवतींना, मुलींना प्रशिक्षित करण्याचे काम वणीतील आखाड्यानी करावे असे आवाहन विजयबाबू चोरडिया, गणेशजी किंद्रे, संजय खाडे यांनी केले.
या सोहळ्याचे निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात समिट ठसा उमटविणाऱ्या विजय मुकेवार प्रा. पुरुषोत्तम पाटील, मोहनसिंह रामचंद्र ताराचंद, नृसिंह आखाड्याचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, वस्ताद पुरुषोत्तम आकेवार, श्री. शिवाजी आखाड्याचे अध्यक्ष प्रमोद निकुरे, वस्ताद विठ्ठल चौधरी, श्रीराम लाठी आखाड्याचे अध्यक्ष कुणाल सोमशेट्टीवार, वस्ताद रामाजी डफळे,वस्ताद संजय सोमशेट्टीवार यांना सन्मानचिन्ह व शॉल देवून सत्कार करण्यात आला.
वणीच्या सांस्कृतीक व क्रिडा वैभवात भर टाकणाऱ्या चारही आखाड्यातील चमुनी मनोहारी प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन वणीकरांना केले हजारोच्या संख्येने वणीकर बंधू भगिनी या सोहळ्यास उपस्थीत होत्या.श्री हनुमान लाठी आखाड्याचे अध्यक्ष सुरेश रायपुरे यांच्या पुढाकाराने झालेला या प्राचीन युद्धकला प्रदर्शन व सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक सुधाकर गारघाटे यांनी केले. सुत्रसंचालन विलास सेरकी यांनी तर आभार प्रदर्शन श्री हनुमान लाठी अखाडा गणेश मंडळाचे अध्यक्ष योगेश रायपूरे यांनी केले.
या सोहळ्याचे यशस्वीतेसाठी ऋषी रायपूरे, दिपक रामटेके, शिवा रायपूरे, सुनिल नागनवार, भाऊराव उंदीरवाडे, शाम रामटेके, वेंकटेश भामीडवार, दुर्गादास कुंभारे, गणेश रायपुरे, रामदास चुनारकर, बुचन्ना नाईक, नितिन भडगरे, दिनेश रायपुरे इत्यादी यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या