Type Here to Get Search Results !

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान

वणी : 

        मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्री पकडुन ती जाळून नष्ट केली. या कारवाई विरोधात धाडसी पाऊल उचलल्याने मनसेचे राजू उंबरकर यांनी या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले.

          या महिला पदाधिकाऱ्यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करत, त्यांचा गैरव्यवहार उघडकीस आणला. त्यांच्या धाडसामुळे परिसरातील नागरिकांना एक नवा आदर्श मिळाला असून अवैध व्यापाराविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

               यावेळी बोलताना, उंबरकर यांनी सांगितले की, "समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महिला शक्तीचे योगदान अतुलनीय आहे. अशा प्रकारे अवैध धंद्यांवर कारवाई करून महिलांनी समाजहिताचे उदाहरण घालून दिले आहे. मनसेच्या या लढणाऱ्या रणरागिनी यांच्या पाठीशी त्यांचा भाऊ म्हणून मी कायम उभा आहे.

       यावेळी सन्मानित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "हे कार्य आम्ही समाजाच्या भल्यासाठी केले आहे. आम्हाला उंबरकर यांच्याकडून मिळालेला हा सन्मान आम्हाला पुढे अधिक धाडसी काम करण्याची प्रेरणा देईल.

        यावेळी सत्कार समारंभाला उपस्थित महिला अर्चना राजू  सोनटक्के, सिंधु पंढरी सोनटक्के,  वनिता बंडू ढोके, माया तुकाराम कडूकर, लता धनराज लखमापुरे, इंदिरा पुरुषोत्तम सोनटक्के, सुनिता गजानन सोनटक्के, माया राजु ढोके , सोनु गजानन काळे, सुनंदा प्रविण राजुरकर, सुनिता प्रशांत सोनटक्के, सिमा रोशन शिंदे ,मंजुषा भास्कर ढोके, माला नामदेव श्रीरसागर, उज्वला गजानन बरडे, अनुसया शेळमाके, शांताबाई आत्राम,नंदाबाई पोळाळकर, शोभा राजु शेळमाके, कांता शेंदरे, मीना जुमनाके व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या मालेगाव तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, मनसे वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, मारेगाव शहर संघटक नवी शेख, मनसे सैनिक रोशन शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad