Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न

वणी, शुभम कडू :

                             येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात नुकतेच शाळेतील परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध जातीचे वृक्ष लावण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अभय पारखी होते तर प्रमुख अतिथी वणी पब्लीक स्कुलच्या मुख्याध्यापीका सौ. राजुरकर मॅडम व औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सतिश पाटील उपस्थीत होते.

             या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक अभय पारखी सरांनी मार्गदर्शनात सांगीतले कि, आजच्या प्रदुषीत वातावरणात निसर्गाला जपणे अती आवश्यक झाले आहे, स्वच्छ वातावरण रहावे, स्वच्छ आॅक्सीजन मिळावे यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम सतत करीत राहीले पाहीजे.

      कार्यक्रमाची प्रस्तावना गंगारेड्डी बोडखे, संचालन सौ. अनिता टोंगे तर आभार प्रदर्शन प्रतिश लखमापुरे यांनी केले. वृक्षारोपनात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेन्द्र देवतळे, सुनिल गेडाम, हरीष वासेकर, हरीष बोढाले, जितेन्द्र डगावकर यांनी अथक प्रयत्न केले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad