प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या आणि सामाजिक विषय स्त्री पुरुष समानता, पर्यावरण, बुवाबाजी यांचा भांडाफोड करून त्यांनी केलेला चमत्कार कसा केला याची शास्त्रीय माहिती देवून समाजाला सजग व विवेकी बनविणे या बाबींसाठी वाहिलेल्या प्रत्येक महिण्याला संपूर्ण महाराष्ट्रसह अनेक राज्यांत असलेल्या मराठी भाषिकापर्यत पोहचविलेल्या पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांची पेरणी करणा-या असे विज्ञाननिष्ठ असलेले अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मुखपत्राचे प्रकाशन वर्धा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मा अमरभाऊ काळे यांच्या हस्ते आर्वि येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त लोकसेवक मा आमटे, शिक्षण हक्क परिषदेचे मा देशमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहनिश सवाई, जवान डिफेन्स ॲन्ड स्पोर्ट्स करीअर अकॅडमी वर्धा चे संचालक व माजी सैनिक प्रविण पेठे व ईतर कार्यकर्ते यासह मोठ्या प्रमाणात खासदार अमरभाऊ काळे यांचा चहाता वर्ग उपस्थित होता.



