प्रतिनिधी / वर्धा (मंगेश राऊत) :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांची काही हिन्दुत्ववादी माथेफिरू असलेल्या तरूणांनी जवळून रिल्वावरने गोळ्या झाडून सकाळी माॅर्निग वाॅक ला फिरत असताना पुणे येथील दांडेकर पुलावर हत्या केली त्याला आज २० ऑगस्ट २०२४ ला अकरा वर्षें पुर्ण झाली मात्र अजूनही मुख्य सुत्रधार व हत्ये मागिल मास्टर माईंड यांना अटक तर सोडाच साधी चौकशीही करण्यात आली नाही याचा निषेध म्हणून व शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शिवाजी चौक, वर्धा येथे एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी निर्भय माॅर्निग वाॅक करून शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन केले.
यावेळी शिवाजी चौक येथे सकाळी 7 वाजता एकत्र येऊन रेस्ट हाऊस मार्गै म. गांधी पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते शिक्षणमहर्षी बापुराव देशमुख पुतळा ते शिवाजी चौक येथे समापन करण्यात आले यावेळी समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे,जवान डिफेन्स ॲन्ड स्पोर्ट्स करीअर अकॅडमी वर्धा चे संचालक माजी सैनिक प्रविणजी पेठे,म फुले समता परिषदेचे अध्यक्ष विनय डहाके, सत्यशोधक समाजाच्या महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी पाटील ,समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण भोसले, जिल्हा प्रधान सचिव सुनील ढाले, प्रशिक्षण विभागाच्या कार्यवाह डॉ माधुरी झाडे, महिला विभागाच्या कार्यवाह व्दारकाताई ईमडवार, बुवाबाजी विभागाचे कार्यवाह भरत कोकावार ,विविध उपक्रम विभागाचे कार्यवाह निखिल जवादे,कार्यकर्ता रूपेश वैद्य,कु.नेहा शेळके यांनी निर्भय माॅर्निग वाॅक मध्ये सहभाग घेतला.




