वणी :
बाबरी मस्जीद जेव्हा पाडण्यात आली. तेव्हाच देशातील डाव्या पक्षांनी ईतर पुरोगामी पक्षांना व नागरीकांना सांगीतले होते कि या पुढच्या काळात भारताचे संवीधान धोक्यात आहे. तेव्हा सर्वच चुप होते.नंतरच्या काळात त्यांनी संविधान बदलण्याची भाषा सुरू केली,जंतरमंतर वर संविधानाच्या प्रती जाळण्याची घटना घडली, कर्नाटकात तर एका माजी केंद्रीय मंत्र्यानी तर भाषणात सांगुणच टाकले कि त्यांना संविधान बदलायचे आहे. घटनेच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्षता शब्दच काढुन टाकण्यात आला.
अशा कितीतरी संविधानविरोधी घटना घडत आहेत. तरीही सर्वझन चुप बसून होते,आतातर सर्वांना झळ पोहोचायला सुरूवात झाली आहे. उशीरा का होईना देशातील पुरोगामी पक्ष व संघटना एकत्र येत आहे, लोकसभा निवडणुकीत त्याचा परीणाम दिसुन पुरोगामी पक्षांची शक्तींची लक्षणीय वाढ केली आहे. असेच आता महाराष्टात सत्ता परीवर्तन करून डावी लोकशाहीवादी शक्तींचे सरकार आणायचे आहे.अशा आशयाचे विचार नुकतेच वणी व मारेगाव येथील वसंत जिनींगच्या सभागृहात संपन्न 'संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव' अभियानातील अ.भा. अंधश्रध्दा निर्मुलन समीतिचे अध्यक्ष मा.श्याम मानव व्याख्यानाचे प्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अनिल हेपट यांनी विचार व्यक्त केले.
मा. श्याम मानव यांचे व्याख्यानाचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पि.के.टोंगे होते. तर माजी आमदार वामनराव कासावार, प्रा.टिकाराम कोंगरे, संजय देरकर, संजय खाडे, आशीष खुळसंगे, अजय धोबे, कॉ.अनिल हेपट, अंबादास वागदरकर, कॉ.कुमार मोहरमपुरी, प्रवीण खारकर, दशरथ मडावी, सुरेश खुरमुरे यांची प्रमुख उपस्थीती होती.
यावेळी सर्वांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ट साहीत्यीक मा. दशरथ मडावी यांनी केली. संचालन संजय गोडे यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.अनिल घाटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, मराठा सेवा संघ, शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी कांग्रेस(शरद पवार), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ जनआंदोलन समिती, सेवानिवृत्त समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परीश्रम घेतले.







