Type Here to Get Search Results !

अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न

वणी, शुभम कडू :
                               अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) श्री स्वामी समर्थ नगर चिखलगाव-वणी, जि. यवतमाळ येथे अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला.

          सप्ताहाची सुरुवात दि. ३० एप्रिल झाली असून या काळात केंद्रामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.  यामध्ये ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी, अग्नीप्रदिपन, मंडल स्थापना, स्थापित देवता हवन, नित्यस्वाहाकार, गणेश याग/मनोबोध याग, स्वामी याग, चंडी याग, गिताई याग, रूद्र याग, मल्हारी याग, बलिपूर्णाहुती, श्री सत्यदत्त पूजन असे विशेष याग संपन्न झाले. 

   तसेच दैनंदिन कार्यक्रम मध्ये औदुंबर प्रदक्षिणा, भूपाळी आरती, सामुदायिक श्री गुरुवरित्र वाचन त्याच वेळी यज्ञ मंडपात नित्य स्वाहाकार, नैवद्य आरती, विशेषयाग, श्री स्वामी चरित्र वाचन, श्री दुर्गासमशती, श्री रुद्र, श्री मल्हारी सप्तशती वाचन, श्री स्वामी समर्थ मंत्र १ माळ, नित्यध्यान, गितेचा १५ वा अध्याय, श्रीविष्णुसहस्रनाम घेण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. 

    सप्ताहाची सांगता दि. ३० तारखेला सकाळी महानैवेद्य आरती व महाप्रसादानंतर झाली. यावेळी भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016