Type Here to Get Search Results !

छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन

वणी, शुभम कडू : 

                  महाराष्ट्राने देशाला अनेक समाज सुधारक दिले, महात्मा फुलें पासून ते आंबेडकर, गाडगे महाराज, कर्मवीर असे अनेक. समतेची शिकवण देणारे शाहू महाराज हे लोकोत्तर पुरूष होते. समाजातल्या तळागाळातील लोकांना त्यांचा आधार वाटायचा. भारतात पहिल्यांदा सर्व समाजाच्या मुलांना शिक्षणाची आणि वसतिगृहाची सोय करून देणारे ते युगपुरूष होते. मुलीच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहान दिले. अशा या छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी दिनी सावित्रीबाई फुले वाचनालयात अभिवादन करण्यात आले. 

               कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी प्रमुख अतिथी मोहनराव हरडे व प्रभाकरराव होते. कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष अशोक चौधरी तर   उपस्थितांचे आभार सहसचिव गजेंद्र भोयर यांनी मानले. यावेळी वाचनालयात कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016