Type Here to Get Search Results !

मनसेच्या मागणीने विद्यार्थ्यांना मिळतोय न्याय !

वणी, शुभम कडू : 

                    वणी मतदारसंघातील विरकुंड आणि बोर्डा या मार्गावरील एसटी बस पुन्हा सुरु करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी मनसेचे राजू उंबरकर यांच्याशी संपर्क करून एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन एसटी बस विद्यार्थ्यासाठी पुन्हा सुरू केली. 

                    नुकत्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपून शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर झाल्या. उन्हाचा पारा देखील ४० अंश पार गेला आहे त्यामुळे नागरिक देखील घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या असल्याने वणी मतदारसंघातील विरकुंड आणि बोर्डा मार्गावरील एसटी बस च्या फेऱ्या बंद केल्याने नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवासात अडचण निर्माण होत होती. यासाठी विद्यार्थ्यांनी मनसेचे राजू उंबरकर यांच्याशी संपर्क करून बस सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी केली. या मागणीला कोणताही विलंब न लावता मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी काल (दिनांक ०२ मे) आगार प्रमुख खाडीलकर यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या तसेच तात्काळ एसटी बस सुरू करण्याची मागणी केली. या मागणीला आगार प्रमुखांनी सकारात्मकता दर्शवून एसटी बस पुन्हा तात्काळ सुरू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवास करण्यास कोणतीही अडचण होणार नसल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांनी मनसेचे आभार मानले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

IMG-20260924-WA0016