वणी, शुभम कडू :
शहरातील सुप्रसिद्ध क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महाराष्ट्र दिनानिमित्त वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर प्रमुख पाहुणे प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यांनतर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष यांनी वाचनालयाचे पदाधिकारी, सर्व सदस्य, सभासद,कर्मचाऱ्यांना आणि परिसरातील उपस्थित मान्यवरांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या मातृभूमीची मराठी भाषेची अस्मिता सदैव गौरवशाली, अभिमानी असो 'जय महाराष्ट्र' च्या घोषणा देत महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे वणी तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, वाचनालयाचे संचालक अनिलकुमार टोंगे, सुरेश राजूरकर, भाऊसाहेब आसुटकर, शंकर पूनवटकर, नामदेवराव जेनेकर, नितीन मोहितकर, परिसरातील गोहोकार साहेब, प्रभाकरराव मोहितकर,अर्जुन गोहोकार आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे कोषाध्यक्ष अशोक चौधरी, सूत्रसंचालन सचिव प्रा. विजय बोबडे तर उपस्थितांचे आभार सहसचिव गजेंद्र भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या