Type Here to Get Search Results !

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी

वणी, शुभम कडू : 

               उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत आहे. शहरातील सर्व भागात नगर परिषदेकडून नळाद्वारे तर काही भागात बोअरवेल कनेक्शन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येते. परंतु जैन लेआउट या भागात १०-१२ तर सुभाषचंद्र बोस चौकातील रहिवाशांना ७ - ८ दिवस पाणीपुरवठा होत नाही. 

            गेल्या अनेक दिवसांपासून शहरात अनेक भागात पाणीपुरवठा करण्यात नगर परिषदेकडून अनियमितता करण्यात येत होत आहे. तर ज्या भागा बोअर वेल द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तिथे सुद्धा भूजल पातळी खाली गेल्याने अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. यातील काही लोकांना पाणी मिळते तर बहुतांश लोकं पाण्यापासून वंचित राहत आहे. यासर्व परिस्थिती मुळे शहरात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंबधी येथील नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात वारंवार लेखी व मौखीक तक्रारी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. यासर्व गोष्टीचे परिणाम शहरवासीयांच्या दैनदिन जीवनावर होत आहे.त्यामुळे शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत करणे अत्यंत महत्वाचे आहे. 

      ज्या ज्या ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा करणे शक्य आहे तिथे पाणी पुरवठा सुरळीत करावा व ज्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे हे शक्य होत नसेल त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून तत्काळ  टँकरद्वारे पाणी पुरवठा करून हा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे यांनी वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या कडे एका निवेदनातून केली. येत्या दोन दिवसात नियमित व मुबलक पाणीपुरवठा पाणी पुरवठा न झाल्यास जनतेच्या हितार्थ आम्हास लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल यातून होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासन जबाबदार असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.

         यावेळी मनसे महीला सेना जिल्हाध्यक्षा सौ. अर्चना बोदाडकर, वैशाली तायडे, लक्की सोमकुंवर, मयुर गेडाम, वैभव पुराणकर, हिमांशू बोहरा, संतोष लक्षशेट्टीवार, रोहन पारखी, प्रतिभा पानघाटे, नानिबाई खाडे, छाया कारेकर, माला मोहुर्ले, वीणा पानघाटे, सातभाई, मुके, दांडगे यांच्या सह वणी शहरातील महिला व नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad