प्रतिनिधी/वर्धा (मंगेश राऊत) :
दिनांक 12 मे 2024 रोजी सेवाग्राम येथे किशोरवयीन मुलांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती वर्धा जिल्हा तसेच नई तालीम शिक्षण समिति यांच्या मार्फत शिबिराचे आयोजन अहिंसा कुटी मध्ये करण्यात आले होते.
यावेळी वर्ध्यातील विविध वयोगटातील 50 विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी उपस्थिती लावली. शिबिर सकाळी 9 ते 5 पर्यंत या वेळेत चालले या एक दिवसीय शिबिरात मुलांना सामाजिक विज्ञान पर्यावरण, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्प विज्ञान, विश्वाची व माणसाची निर्मिती, चमत्कार व त्यामागील विज्ञान कचऱ्यातून कला अशा विविध विषय व भरपूर खेळ व गीते घेऊन हे शिबिर पार पाडले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रभाकर पुसदकर, किरणताई उल्लास जाजू, गजेंद्र सुरकार, अरूण भोसले निखील जवादे, प्रकाश कांबळे हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान चे अध्यक्ष आशाताई बोथरा व प्रमुख पाहुणे मंत्री विजय तांबे हे उपस्थित होते.
सूत्रसंचालन भाग्यश्री उगले व आभार सुनील ढाले यांनी केले. या शिबिरा साठी मंजुषा देशमुख, सारिका डेहणकर, द्वारका इमडवार, माधुरी झाडे, हरिष पेटकर, शंकर श्रीरामे, रोहन आदेवार, विशाल कांबळे आदीं कार्यकर्ते उपास्थित होते.





