कोरा/प्रतिनिधि(मंगेश राऊत) :
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथिल आजोबा आपली मुलगी व नातीन यांच्यासह नागपुरवरुन दुचाकीने गावाकडे परत येत असतांना बुट्टीबोरी जवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला यात आजोबाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी व नातीन यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचाही दुर्दैवी मुत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे गिरड गावात शोककळा पसरली आहे .प्राप्त माहितीनुसार गिरड येथील पुणिराम येनुरकर हे २८ एप्रिलला आपल्या आप्तसंबंधाच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे गेले होते. तेथे साक्षगधांचा कार्यक्रम आटोपून ते आज दिनांक २९ एप्रिलला आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.३२ ए.एम.१९९६ ने परतीचा प्रवास करत असताना त्यांच्या सोबत असलेलली हिंगणघाट येथिल त्यांची मुलगी सुचिता सुधिर दांडेकर वय ३५ वर्ष व नातीन खुशी सुधिर दांडेकर वय १५ वर्ष यांच्यासह ११ .३० वाजताच्या सुमारास गिरड गावाकडे परत येत असतांना बुट्टीबोरी जवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात पुनिराम येनुरकर राहणार गिरड यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी सुचिता व नातीन खुशी गंभीर जखमी झाले होते त्यांना नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना दोघिंचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गिरड गावात सर्वत्र शोककळा पसरली असून नेमका अपघात कशाने झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


