महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार श्री धनंजय मुंडे यांचे वणी ला डॉ. महेन्द्रजी लोढा यांचे निवासस्थानी आगमनानिमित्त पूर्वसंध्येला त्यांचे वणी तालुका काँग्रेस कमिटी द्वारे जंगी स्वागत करण्यात आले.
शेतकऱ्यांची व्यथा वणी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांना देऊन सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा. पुरबुडी, ओल्या दुष्काळामुळे नष्ट झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यात यावी. दिवसाला रोज १० तास विज मिळण्यात यावी. कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे देण्यात यावे, सोयाबीन ला ८ हजार रुपये, तुरीला १३ हजार रुपये याप्रमाणे आधारभूत किमतीच्या दीडपट भाव देण्यात यावा, जंगली जनावरांचा बंदोबस्त तात्काळ करण्याकरिता तारेचे कुंपणाला सरसकट अनुदान देण्यात यावे. हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नाला धरून डॉ. महेन्द्रजी लोढा यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ नेते श्री जयसिंग पा गोहोकार, वणी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष घनश्याम पावडे, राकेश खुराणा, वसंत जिनींग चे उपाध्यक्ष जयभाऊ आबड, अशोकजी पांडे, तसेच कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.


