Type Here to Get Search Results !

ट्रकचे चाक महिलेचे डोक्यावरून गेल्याने महिला जागीच ठार

वणी, शुभम कडू : शहरातील रवीनगर येथे राहत   असलेले उत्तमराव भोंगळे हे स्वतःच्या दुचाकीने पत्नी छबूताई भोंगळे यांना घेऊन वरोरा येथे एका कार्यक्रमासाठी जात होते. पण बायपास मार्गाने जात असताना वडगाव फाट्याजवळ  त्यांची दुचाकी स्लीप झाली. यामुळे दुचाकी खाली पडली यामध्ये छबूताई  रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येत असलेल्या एका ट्रकचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाली. उत्तमराव हे रस्त्याच्या पलीकडील बाजूने पडल्याने त्यांना किरकोळ जखम झाली. 

           हा अपघात आज दिनांक ५ जानेवारी ला सकाळी ११:१० वाजताच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad