शिरपूर/प्रतिनिधी : वणी तालुक्यातील शिरपूर हे गाव पुनवट, शिरपूर, कायर व शिंदोला या चारही महसूल मंडळाच्या केंद्रस्थानी असून, या ठिकाणी तहसीलचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी चारही गावातील सरपंच आणि सर्व गावकऱ्यांची आहे.
या मागणी करिता चारही मंडळाच्या सरपंचानी आपले समर्थन पत्र त्याबरोबरच ठराव देऊनही मागणी मागील २०१२ या वर्षा पासून प्रलंबित आहे.
याच विषयानुसार शिरपूर ग्रामवासी तसेच आजूबाजूच्या ग्रामवासी कार्यालयामार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेले आहे. परंतु अजूनपर्यंत त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचे पत्र प्राप्त झाले नसल्याने शेवटी शिरपूर ग्रामवासीयांनी दि. ०९ डिसेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरुवात केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या