Type Here to Get Search Results !

वागदरा येथे सार्वजनिक ठिकाणी चालतोय पैशाचा जुगार, पोलिसांची कारवाई


वणी, शुभम कडू : वणी शहराला लागून असलेल्या वागदरा येथे सार्वजनिक ठिकाणी पैशाचा जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती API दत्ता पेंडकर यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह तिथे गेले असता त्यांना काहीजण जुगार खेळताना दिसून आले. यावेळी पोलीस पथकाने धाड टाकून जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना अटक केली. ही कार्यवाही दि. ०७ डिसेंबरला सायंकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास करण्यात आली. आरोपी अवि वामन पाचभाई (२६),तेजस संजय देठे (२२), रितेश संजय पंडिले (२५), राजेश ज्ञानेश्वर मेश्राम (३४) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर मजुका च्या कलम १२(अ ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश कींद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस कॉन्स्टेबल वासिम शेख, गजानन कुडमेथे, ललित यांनी केली.

Tags

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad