Type Here to Get Search Results !

आजपासून शिंदोला येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व व्यसनमुक्ती सप्ताह


शिंदोला/प्रतिनिधी : गुरुदेव सेवा मंडळ व माऊली परीवार शिंदोला यांच्या हस्ते श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व व्यसनमुक्ती सप्ताह दि.९/१२/२०२३ ते दि.१५/१२/२०२३ रोजी बोबडे ले आऊट, शिंदोला ता. वणी येथे रोज सकाळी ६ वाजता ध्यानपाठ सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामसफाई होणार असुन दि. ११/१२/२०२३ ला आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे आपला गाव सुंदर गाव व्यसनमुक्त गाव या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. तसेच ह.भ.प. रामेश्वर महाराज खोडे रा. ईसापुर (दिग्रस) यांच्या सुमधूर वाणीतून श्रीमद भागवत कथा आपल्याला श्रवन करता येईल तसेच ग्रंथ दींडी काल्याचे किर्तन आणि महाप्रसाद होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच-सदस्य आमंत्रित राहण्याचे आवाहन सर्व शिंदोला ग्रामस्थ माऊली परीवार यांनी केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad