Type Here to Get Search Results !

वणी काँग्रेस कमिटीची मागणी, वन्यप्राण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी

वणी, शुभम कडू : तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांना शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा  शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. यासबंधीतीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, तालुकाध्यक्ष प्रमोद वासेकर, रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड अध्यक्ष संजय खाडे, पुरूषोत्तम आवारी, तेजराज बोढे, प्रफुल उपरे, रामचंद्र वाभिटकर, ज्ञानेश्वर बेलेकर, मारोतराव पाचभाई, मारोतराव बल्की, अरविंद बोबडे, साधनाताई गोहोकार, शारदाबाई ठाकरे, अशोक नागभिडकर, प्रदिप खेकारे, प्रशांत गोहोकार, तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी, लाखो शेतकऱ्यांचे जीवन मरणाचे प्रश्न सोडवावे, यांसाठी उपाययोजनांची मागणी निवेदनातून करण्यात आली.
वैयक्तिक शेतकऱ्यांना जाळीचे कुंपणासाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा वन्यप्राणी नासाडीमुळे पीकविम्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांना शेतपिकाचे संरक्षण करता येईल.

स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीदिनी कॉंग्रेस तर्फे अभिवादन 👇👇


Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad