वणी, शुभम कडू : वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे स्व.माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. नगर परिषद परिसररातील स्व.पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वतंत्र भारताचे पहिले माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या कारभाराची धुरा सांभाळली व त्यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात येते. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शरदजी मनथनवार यांचा ही वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला घनश्याम पावडे तालुका अध्यक्ष , प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, काजल शेख महिला सेवादल अध्यक्ष, उत्तम गेडाम, रवी कोटावार, दिनेश पाऊणकर, चंदन धाबेकर ,राजू पेंढारकर, सुवर्णा किनाके, कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या