Type Here to Get Search Results !

राजुर येथील मटका अड्यावर पोलिसांची धाड, रंगेहाथ अटक

    वणी, शुभम कडू : राजुर येथील तेलगू वॉर्डात मटका चालू असल्याची माहिती ठाणेदार अजीत जाधव यांना मिळाली. ठाणेदार अजीत जाधव यांनी पोलिस पथक राजूर येथे पाठवले. तेथे पोलीसांना मटका जुगार खेळताना मोठी गर्दी दिसून आली. पोलिसांनी शिताफीने मटका अड्यावर धाड टाकली. त्यावेळी तेथील लोक पळून गेले परंतु मटका अड्यावर पट्टी फाडणाऱ्या इसम शरद पुनवटकर याला पोलीसांनी रंगेहाथ अटक केली. त्याला विचारले असता या मटका मालकाचे नाव विजय कंडेवार असल्याचे सांगितले. 

  पोलीसांनी विजय कंडेवार यांचा शोध घेतला असता तपासात विजय कंडेवार हा फरार असल्याचे समोर आले. पोलिसांनी शरद पुनवटकर आणि विजय कंडेवार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून मटका मालकाचा पोलीस शोध घेत आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलीस निरीक्षक अजित जाधव तसेच डीबी पथकाचे विकास धडसे, सागर सिडाम, सुनिल नलगंडीवार यांनी केली.


        प्रहार जनशक्ती पक्षाची भालर येथे शाखा स्थापन



Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image