Type Here to Get Search Results !

मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

वणी, शुभम कडू : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, समाजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेले विजय बाबु चोरडिया यांच्या पुढाकारातून भालर आणि मुकुटबन येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ६८७ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजतासून ते दुपारी ०४ पर्यात भालर येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या शिबिरात एकुण ३०० रुग्णांनी लाभ घेतला तर ३२ लोकांना शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात आले.

दि. १९ नोव्हेंबर रोजी मुकुटबन येथील श्री राज राजेश्वर शिव मंदिरात घेण्यात आलेल्या शिबिरात ३८७ लोकांनी लाभ घेतला असून ३८ रुग्णांना मोतिया बिंदु शस्त्रक्रियासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठविण्यात आले आहे. शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्रामच्या टीम ने आरोग्य सेवा दिली. 
विशेष म्हणजे विजय बाबु चोरडिया यांनी यावेळी प्रत्येक शिबिरार्थीची आस्थेने विचारपूस करून प्रत्येक रुग्णांची काळजी घेतली आहे. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णांना येत्या दि. ०५ डिसेंबर रोजी चष्मे वाटप करण्यात येणार आहे. शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, समाज सेवा हिच ईश्वर सेवा फाउंडेशन व स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणी यांच्या सहकार्यातून करण्यात आले होते. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image