विजय नगराळे यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत दिवाळी साजरी
SK News Channel
वणी, शुभम कडू : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी विधानसभा क्षेत्रातर्फे सामाजिक न्याय विभाग, जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांच्या नेतृत्वात वणी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत दिवाळीचा फराळ, मिठाई, महिलांना साडी, चोळी, व आर्थिक मदत देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली. वणी तालुक्यात मागील वर्षी आठ ते दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्या सर्वांच्या ग्रामीण घरी जाऊन भेट देऊन दिवाळी साजरी केली. त्यावेळी सामाजिक न्याय विभाग, जिल्हा अध्यक्ष विजय नगराळे, खुशाल बासमवार, रामकृष्ण वैद्य, विनोद ठेंगणे, गुणवंत टोंगे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.