महाराष्ट्रातील काही भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकरी बांधवांसमोरील संकट लक्षात घेऊन भाजपचे शहराध्यक्ष अॅड. निलेश माया महादेव चौधरी यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली.
अॅड. निलेश चौधरी यांचा वाढदिवस ७ ऑक्टोबर २०२६ रोजी होता. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांनी २१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस मदत म्हणून जमा केले. ही रक्कम उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
संकटाच्या काळात गरजू नागरिक आणि शेतकरी बांधवांना मदतीचा हात मिळावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. “वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस व्हावा,” या भावनेतून ही मदत करण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले.
“महाराष्ट्रातील संकटग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना अॅड. निलेश माया महादेव चौधरी यांनी व्यक्त केली. वाढदिवसाच्या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत केलेल्या या उपक्रमातून ‘आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजासोबत वाटावा’ असा सामाजिक संदेश देण्यात आला. यावेळी महादेव खाडे, डॉ. प्रा. रोहित वनकर, हितेश अटारा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

