Type Here to Get Search Results !

ॲड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वात वणीत भक्तीचा जल्लोष; श्रीकृष्ण शोभायात्रेला हजारोंची उपस्थिती


 वणी : 


        श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी वणी शहरात भव्य भक्तिमय शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. उत्सव समितीचे मार्गदर्शक विजयबाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला.


       सायंकाळी ६ वाजता अमृत भवन येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर, धुमाळ बँड, डीजेची रोषणाई आणि ‘जय श्रीकृष्ण’च्या जयघोषाने संपूर्ण वणी शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.


          शोभायात्रेत वारकरी तसेच पदावली भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरणात आध्यात्मिक रंग भरला. भगवान शंकर-पार्वती, वीर बजरंगबली यांच्यासह विविध देवी-देवतांच्या आकर्षक जिवंत झाक्या नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होत्या. तसेच अघोरी तांडव, गोंडी ढेमसा नृत्य, असुरांची झाकी आणि गोरिला यांसारखी विशेष आकर्षणे शोभायात्रेचे केंद्रबिंदू ठरली.


            शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या शोभायात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपालांसह हजारो भाविक सहभागी झाल्याने शोभायात्रेला विराट स्वरूप प्राप्त झाले.


         उत्सव समितीच्या वतीने सहभागी भाविकांसाठी फराळ व थंडपेयाचे वाटप करण्यात आले. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या भव्य शोभायात्रेमुळे वणी शहरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad