पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच नगर वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगर वाचनालय, वणीच्या वतीने नव्याने खरेदी करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक संदर्भ साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगर वाचनालयामार्फत विविध उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. UPSC, MPSC, IBPS, SSC, बँकिंग, रेल्वे, राज्य लोकसेवा आयोग तसेच TET आदी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त असलेल्या ग्रंथांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे.
या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन २५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता नगर वाचनालय सभागृह, वणी येथे करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह युवक-युवतींनी या प्रदर्शनास भेट देऊन उपलब्ध संदर्भ ग्रंथांची माहिती घ्यावी, असे आवाहन नगर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले विविध विषयांचे संदर्भ साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त वातावरण निर्माण करण्याचा हा उपक्रम असल्याचे नगर वाचनालयाच्या वतीने सांगण्यात आले.


