घुग्घूस :
चंद्रपूर ते घुग्घूस मार्गावर शेणगाव फाट्याजवळ गांजा बाळगून त्याची वाहतूक करणाऱ्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकावर घुग्घूस पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १ किलो ८३० ग्रॅम गांजा, किंमत अंदाजे ९१ हजार ५०० रुपये, तसेच ४० हजार रुपये किमतीची जुनी सुझुकी अॅक्सेस मोपेड असा एकूण १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे चंद्रपूर-घुग्घूस मार्गावरील शेणगाव फाट्यापासून सुमारे ४ किलोमीटर पूर्वेला पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी माहितीच्या आधारे पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून येणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी थांबवून त्याची व वाहनाची झडती घेतली. झडतीदरम्यान प्रतिबंधित गांजा आढळून आला.
याप्रकरणी घुग्घूस पोलीस ठाण्यात अप. क्र. २७३/२०२६ अन्वये कलम २०(ब), ८(क), २९, ४३ NDPS Act तसेच बाल न्याय कायद्यातील कलम ७७, ७८ अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, सपोनि पवन राठोड, PSI रवींद्र वाघ तसेच गुन्हे शोध पथकातील HC अनिल बैठा, विशाल हूड, राकेश तुराणकर, PC महेश भोयर, प्रसन्ना डोरलीकर, पवन डाखरे आणि रवींद्र शेंडे यांनी केली.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या