Type Here to Get Search Results !

HP गॅसच्या नावाखाली मोठा खेळ ? प्रशासनाच्या धाडीत उघड!

मारेगाव :

‎           तालुक्यात थेट जनतेच्या जीवाशी खेळ करणारा आणि शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. HP गॅस एजन्सीचे वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर वाटप करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

‎        २२ एप्रिल २०२६ रोजी पुरवठा विभागाने टाकलेल्या धाडीत बोलेरो पिकअप (MH 29 BE 2737) मधून उघडपणे नियमबाह्य वितरण सुरू असल्याचे आढळले. कोणतीही सुरक्षितता नाही, कोणतेही अधिकृत वितरण केंद्र नाही, थेट रस्त्यावरच गॅस वाटप. 

‎        ही बाब समोर येताच प्रशासनाने तात्काळ कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आणि संबंधितांची चौकशी सुरू केली. एकूण ₹4,30,740 किमतीचा माल जप्त करण्यात आला असून यात 20 रिकामे सिलेंडर (₹30,740), 20 भरलेले सिलेंडर (₹50,000) आणि वाहन (₹3,50,000) यांचा समावेश आहे.

‎       या प्रकरणात महेश कावाडे (वाहन चालक) आणि धम्मपाल दांरूडे (HP गॅस एजन्सी वितरक) यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‎       प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की जीवनावश्यक वस्तूंचा गैरवापर, काळाबाजार किंवा नियमबाह्य विक्री अजिबात सहन केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होणार आहे. या घटनेमुळे मारेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad