भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त नगर वाचनालयात जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ. बाबासाहेबांवरील पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून वाचनालयाचे सचिव गजानन कासावार उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली. त्यानंतर गजानन कासावार यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग उभे करून बौद्ध धर्म स्वीकारण्याआधी हिंदू धर्माच्या धुरिणांना पुरेसा वेळ दिला होता, पण बाबासाहेबांच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे त्यांना या मातीशी नात सांगणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार करावा लागला. असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात हरिहर भागवत यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी वाचनालयात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद लोणारे यांनी केले. आभार प्रदर्शन देवेंद्र भाजीपाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम मेंगावार व कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या