Type Here to Get Search Results !

झुंबा, योगा ग्रुप च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

वणी :-

‎            झुंबा योगा ग्रुप रवी नगर यांच्यावतीने जागतिक महिला दिन सालाबादप्रमाणे याही वर्षी उत्साही वातावरणात संपन्न झाला.

‎           या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ विद्याताई आत्राम नगराध्यक्षा वणी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संचिता नगराळे स्त्रीरोग तज्ञ, ग्राम गीताचार्य विजया दहेकर, सौ किरण नळे, सौ साधना गोहोकार, सौ भावना पोटदुखे, सौ उमदा शेंडे ह्या उपस्थित होत्या.

‎             याप्रसंगी मार्गदर्शन करताना विद्याताई आत्राम या म्हणाल्या की आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतात., कारण त्यांना काम करण्याची संधी मिळाली चूल आणि मूल एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून कालपर्यंत बघितल्या जात होते. पण महिलांना संधी मिळतात प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करण्याची किमया महिलांनी केली. आज एकही क्षेत्र सुटले नाही की ज्यात महिला नाहीत, पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करताना दिसतात. यांचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या बरोबरच अनेक समाज सुधारकांना व घटनाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच द्यावे लागेल.

‎          डॉक्टर संचिता नगराळे म्हणाल्या की प्रत्येक महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्याशिवाय तिला आपल्या कुटुंबाचा गाडा नीट हा कथा येणार नाही. तसेच किरण नळे यांनी सांगितले की, आज समाजात वृद्धाश्रम का वाढत आहेत याची भान महिलांनी ठेवण्याची गरज आहे.

‎           उद्घाटनानंतर लगेचच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. वयाचे भान विसरून महिलांनी नृत्यांमध्ये नोंदविलेला सहभाग लक्षणीय होता. तरुणींना लाजवेल असा अदा महिलांनी सादर केल्या. काहींनी नाटिका मिमिक्री फॅन्सी ड्रेस आदी सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

‎       कार्यक्रमाच्या निमित्ताने वयाची साठी ओलांडलेल्या सौ सुषमा पाटील, पुष्पाताई कुळसंगे, हेपट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच आदल्या दिवशी महिलांच्या खेळाच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात बक्षीसपात्र महिलांना बक्षीस व भेटवस्तू देण्यात आल्या.

‎          कार्यक्रमाचे बहारदार संचालन बुटले आणि कुंदा कुमलवार यांनी केले. 9 मार्चला सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमानंतर महिला दिनाचा समारोप करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57