तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘पोस्ट ऑफ द मंथ – जानेवारी २०२६’ या उपक्रमांतर्गत दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गौरव करण्यात आला. विनोबा ॲपवरील उत्कृष्ट आणि सृजनशील शैक्षणिक पोस्टच्या आधारे निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात मा. गटशिक्षणाधिकारी श्री. स्नेहदीप काटकर तसेच तालुका समन्वयक श्री. विनोद नासरे यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांना पुढील शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आल्या.
जानेवारी महिन्याचे मानकरी शिक्षक म्हणून जीवन चौधरी, सुरेश बदखल, माधुरी कावडे आणि आशाकला कोवे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, सृजनशील अध्यापन पद्धती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सकारात्मक बदल होत असून शिक्षणाला नवी दिशा मिळत आहे.
विनोबा ॲपवरील त्यांच्या पोस्टमधून कार्यातील समर्पण, जिद्द आणि नवोन्मेष स्पष्टपणे दिसून येत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या शिक्षकांच्या कार्यामुळे तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचा अभिमानही व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचा शेवट सर्व मानकरी शिक्षकांचे अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या