Type Here to Get Search Results !

माधव सरपटवार सरांच्या जाण्याने वणीतील ज्ञानदीप मालवला

वणी :

           सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव गंगाधर सरपटवार (84) यांच्या निधनाने वणी शहरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास प्रदीर्घ आजाराशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 11 वाजता स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार असून अंतिम यात्रा यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसरातून निघेल.

                 सरपटवार सरांनी आयुष्यभर शिक्षण, साहित्य, संस्कार आणि समाजकारण यांचा सुंदर सेतू बांधला. श्री जैताई देवस्थान, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ आणि मित्र मंडळ अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी माणुसकीचा आणि कार्याचा प्रेरणादायी ठसा उमटवला. अनेक पुस्तकांचे संपादन-लेखन करून विचारांची मशाल त्यांनी पेटती ठेवली.

             मितभाषी, सुस्वाभावी व सदैव शांत स्वभावाची त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व, एक मार्गदर्शक शिक्षक आणि एक संवेदनशील साहित्यप्रेमी हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शैलेश, मुलगी शिल्पा, सून, जावई, नातवंडे तसेच भावंडांचा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात पाणी उभे केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad