वणी :–
बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या 'वंदे मातरम्' या भारत मातेच्या स्तुतीच्या प्रेरणा स्तोत्राला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येथील शासकीय मैदानावर भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन दिनांक 7 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सार्धशताब्दी महोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समिर थेरे व मुख्य वक्ता म्हणून अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा प्र. प्रशासन अधिकारी गजानन कासावार हे मार्गदर्शन करणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या