अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे यवतमाळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचे वातावरण दिसत असून पुढील राजकीय घडामोडी काय वळण घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जिल्हा भाजपमध्ये खळबळ—उपाध्यक्ष चोरडिया पदाचा राजीनामा
0
वणी :
भाजपच्या यवतमाळ जिल्हा संघटनात मोठी घडामोड घडली आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कुणाल विजय चोरडिया यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांचा तात्काळ राजीनामा सादर केला आहे. जिल्हाध्यक्ष मा. प्रफुल चौहान यांना पत्राद्वारे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.
ॲड. चोरडिया यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्याचा सातत्यपूर्ण बहिष्कार, असहकार, तसेच अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात आले. अशा परिस्थितीत संघटनात न्याय्य व परिणामकारकपणे काम करणे अशक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“या अयोग्य वागणुकीमुळे माझ्या राजकीय कार्यक्षमतेवर जाणीवपूर्वक मर्यादा आणण्यात आल्या,” असा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे.
ॲड. चोरडिया यांनी स्पष्ट केले की त्यांचा निर्णय पक्षाविरुद्ध नसून स्थानिक स्तरावर चुकीची वागणूक करणाऱ्या घटकांविरुद्ध आहे.
भाजपची विचारसरणी आणि वरिष्ठ नेतृत्वाविषयी मनात आदर कायम असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
“मा. प्रफुल चौहान यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल व मार्गदर्शनाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे,” असे त्यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.
Tags


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या