Type Here to Get Search Results !

दामले फैलमध्ये कुणाल चोरडियांची दमदार गर्जना; प्रभाग ५ मध्ये शक्तीप्रदर्शनाने विरोधकांत खळबळ

वणी : 

           शहरातील प्रभाग क्र. ५ दामले फैल येथे काल दिनांक 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या भव्य कॉर्नर सभेने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. नागरिकांची उसळलेली गर्दी, प्रभागाच्या विकासाविषयी उमटलेली सकारात्मक लाट आणि प्रमुख वक्त्यांचे प्रभावी भाषण यांच्या जोरावर ही सभा प्रभागातील सर्वाधिक प्रभावी शक्तीप्रदर्शन ठरली.

               सभेला मार्गदर्शन करताना कुणाल चोरडिया यांनी विकासकामांचा आढावा दिला, तर संदीप खोब्रागडे, गीता पडोळे आणि नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार पायल तोडसाम यांनी प्रभागासाठी मांडलेल्या योजनांना उत्स्फूर्त दाद मिळाली. सभेचा मुख्य आकर्षण ठरले ते कुणाल चोरडिया यांचे जोशपूर्ण आणि मुद्देसूद भाषण. प्रभागातील प्रश्नांची त्यांनी केलीले स्पष्ट मांडणी, विकासाचे दिलेले आश्वासन आणि आगामी निवडणुकीतील ताकदीचे संकेत यांनी उपस्थित नागरिकांची एकच दाद मिळवली.

          कुणाल चोरडिया यांच्या दमदार भाषणानंतर सभेतील वातावरण अक्षरशः टाळ्यांच्या गजराने दणाणून गेले. स्थानिकांनी दाखवलेला प्रतिसाद पाहता विरोधकांच्या खेम्यात मात्र चिंतेची रेष प्रकर्षाने जाणवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

               या सभेला मनीष सुरावार, राहुल मुंजेकर, विजय चोरडिया, विनोद मोहितकर, सुरेश रायपुरे, महावीर कटारिया, आशिष गुप्ता, प्रकाश पडोळे या मान्यवरांची उपस्थिती होती. भव्य उपस्थिती, जोशपूर्ण वातावरण आणि नेतृत्वाचा प्रभावी ठसा यामुळे ही सभा प्रभाग ५ मध्ये निवडणुकीपूर्वीची सर्वात मोठी हलचल ठरली असून, विरोधकांसाठी ती निश्चितच धडकी भरवणारी ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad