जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल, रासा येथे आदिवासी समाजाच्या प्रेरणादायी महामानव बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंधरवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी संस्कृती, परंपरा आणि इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आदिवासी घरांना भेट, आदिवासी नृत्य स्पर्धा, एकपात्री नाटक, वेशभूषा प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा यांसारख्या आकर्षक स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपले कौशल्य सादर केले.
पंधरवड्याचा उपक्रममालेचा समारोप 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाने संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उरकुडे सर यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका वर्षा मॅडम उपस्थित होत्या. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुरपाम सर यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुरेख संचलन प्रमोद सर यांनी केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करून त्यांचे आदर्श जीवन, विचार आणि संघर्षमान इतिहास याची प्रेरणादायी ओळख करून दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरारकर मॅडम, पिदुरकर मॅडम, मून मॅडम, पोटे मॅडम, कोटरंगे मॅडम, समीक्षा मॅडम आणि जवादे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी तृप्ती मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.




टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या