Type Here to Get Search Results !

प्रभाग ५ : अर्चना ताजणे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर चर्चांना वेग

वणी : 

         वणी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ हा महिला आरक्षित असल्याने या प्रभागातील राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. माजी नगरसेविका अर्चना सुभाष ताजणे (रा. तेली फैल) यांना आ. देरकर यांच्या गटाच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा १३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या घोषणेनंतर त्या प्रभागातील चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

          ताजणे महिला गटातून निवडणूक लढवणार असल्याने तेली फैल, दामले नगर, सिंधी कॉलनी, भीमनगर आणि इतर उपपरिसरांत त्यांच्या उमेदवारीबाबत मतदारांमध्ये उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

            अर्चना ताजणे यांच्या पती स्व. सुभाष ताजणे हे पूर्वी राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या कार्यकाळातील राजकीय सहभागामुळे ताजणे कुटुंबाची या प्रभागात ओळख असून, त्याच पार्श्वभूमीवर अर्चना ताजणे यांच्याबाबतही चर्चा वाढत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे या प्रभागात त्या महत्त्वाच्या दावेदारांपैकी एक ठरू शकतात, अशी स्थानिक पातळीवरील चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

file-00000000607071fa94a1583f7cbced57