Type Here to Get Search Results !

मारेगाव हादरले! जुन्या वादातून तरुणावर हल्ला — दोघे भावंडे अटकेच्या विळख्यात

मारेगाव  :

                 जुन्या वादातून थेट हल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या घटनेने मारेगाव शहरात खळबळ उडाली आहे. पंचशील चौक परिसरात एका २० वर्षीय तरुणावर, हातातील कळ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोन भावंडांविरुद्ध मारेगाव पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

                      फिर्यादी अभिजीत नगराळे (वय २०, रा. वनोजा, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असून मारेगाव येथे साहील काळे याच्यासोबत काम करतात. दिनांक २० सप्टेंबर रोजी मजुरीचे पैसे साहीलकडे देण्यात आले; मात्र त्याने अभिजीतला पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ आणि थाप्पड मारली होती. त्या वेळी अभिजीतने गावातील मित्र असल्याने तक्रार केली नव्हती.

                    मात्र, जुन्या वादाची पेटलेली ठिणगी अखेर सायंकाळी ३ ऑक्टोबरला धगधगली. पंचशील चौकात बसलेल्या अभिजीतवर साहील काळे याने अचानक मागून येऊन हातातील कळ्याने डोक्यावर प्रहार केला. रक्तबंबाळ झालेला अभिजीत कसाबसा घरी पोहोचला, पण इतक्यातच साहीलचा भाऊ राकेश काळे घराच्या अंगणात घुसून अभिजीत व त्याच्या वडिलांना हाताबुक्क्यांनी मारहाण करत “जिवे मारून टाकीन” अशी धमकी दिली.

                गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला. त्यानंतर अभिजीतने वडिलांसह पोलीस स्टेशन गाठून दोन्ही भावंडांविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) 2023 च्या कलम 118(1), 351(2), 351(3) व 352 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

             स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad