Type Here to Get Search Results !

३८ व्या वर्षी राखी लोहकरे यांचे निधन : आज सकाळी अंत्यसंस्कार

वणी : 

             स्थानिक रंगनाथ नगर येथील रहिवासी राखी सचिन लोहकरे (वय ३८) यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातील दिवंगत कर्मचारी त्र्यंबक वितोंडे यांच्या कन्या होत. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी असून नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

            त्यांच्या निधनाची वार्ता कळताच परिसरात शोककळा पसरली. मनमिळावू, सर्वांना आपुलकीने जपणाऱ्या राखी लोहकरे यांच्या अकाली जाण्याने कुटुंबासह नातेवाईक, मित्रपरिवार व समाजमंडळीत हळहळ व्यक्त होत आहे.

               वणी येथील मोक्षधाम येथे शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुलं व आई असा आप्तपरिवार आहे.

            राखी लोहकरे यांच्या अकाली निधनामुळे वणी शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र दुःखाची भावना व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या