Type Here to Get Search Results !

“बुद्धांच्या करुणेचीच आज जगाला गरज” — डॉ. विनोद आसुदानी यांचे प्रतिपादन

वणी  :

           “बुद्धाची करुणा हीच कवितेचा आत्मा आहे. आज जगाला अण्वस्त्रांची नाही, तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे. भूक आणि हिंसा संपली त्या दिवशीच विश्वात खरी मानवता नांदेल,” असे विचार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी डॉ. विनोद आसुदानी यांनी व्यक्त केले.

              तालुक्यातील शेगाव येथील ‘कवितेचे घर’ येथे शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी बाबुरावजी पेटकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

            या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेतील विद्यापीठाने डी.लिट् पदवीने सन्मानित कवी डॉ. विनोद आसुदानी, प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, अभिनेत्री व आकाशवाणी निवेदिका मा. मेघना साने, उद्योजक प्रकाशजी पदमावार, श्रीकांत पेटकरकिशोर पेटकर यांची उपस्थिती लाभली.

             कार्यक्रमात वर्ष २०२४–२५ या वर्षात प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रह व ‘स्थळ’ या त्रिचपटावर आधारित समीक्षा लेखन स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले.


     🏆 स्पर्धा विजेते पुढीलप्रमाणे - 

👉 समीक्षा लेखन स्पर्धा :


प्रथम – अशोक गौरकार, वणी

द्वितीय – आदित्य देशमुख

तृतीय – पंडीत लोंढे


👉 उत्कृष्ट काव्यसंग्रह : प्रभू राजगडकर


👉उत्कृष्ट गझलसंग्रह : गजानन वाघमारे, नंदकिशोर दामोदरे


👉उत्कृष्ट बालकविता संग्रह : प्रसेनजीत गायकवाड, मोहन काळे


👉 राज्यस्तरीय विशेष पुरस्कार : किरण भावसार


        सर्व विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

                   कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळकरी मुलांनी कविता गायन करत गावातून प्रभातफेरी काढली. तसेच साहित्य, कथा व कादंबरी लेखन क्षेत्रातील दीपक शीव, वैशाली रामटेके, डॉ. माधुरी मानवटकर व राजरत्न पेटकर यांचा सत्कार करण्यात आला.

                   कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सविता बगडे यांनी केले.

Tags

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad