मिळालेल्या माहितीनुसार, संदीप विजय चामुलवार (वय 38, रा. रंगारिपुरा, वणी) आणि त्याचा मित्र सचीन प्रकाश येलालवार (वय 23, रा. रंगारिपुरा, वणी) हे दोघे मोटारसायकल (क्रमांक MH 29 Z 7192) वरून मुकुटबन येथून वणीच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. उमरी व नवरगावच्या दरम्यान अंधारात रस्त्यावर ट्रक (क्रमांक MH 34 BG 8962) निष्काळजीपणे व बिनइंडीकेटर उभा करण्यात आला होता. त्यामुळे मोटारसायकल ट्रकला जोरदार धडकली आणि दोघेजण जागीच मरण पावले.
या अपघाताबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) 2023 कलम 106(1) व 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या