Type Here to Get Search Results !

नेत्रसेवेचा संकल्प: पवन एकरे यांचा जनहित उपक्रम

वणी : 

           भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष श्री. पवनभाऊ एकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

             हा सेवा उपक्रम सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अहिल्यादेवी होळकर सभागृह, लालगुडा येथे पार पडणार आहे.

      या शिबिरामध्ये प्रख्यात नेत्रतज्ज्ञांमार्फत डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आवश्यक औषधोपचार आणि वैद्यकीय सल्ला पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम सर्वांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

            श्री. पवनभाऊ एकरे यांनी आपल्या नेतृत्वातून सदैव समाजसेवेचा वसा जपला आहे. शेतकरी, युवक, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा परमो धर्म” या भावनेतून समाजोपयोगी कार्य करण्याचा हा संकल्प त्यांनी साकारला आहे.

           “दृष्टी द्या, जीवन उजळा” या उदात्त उद्देशाने राबविण्यात येणारे हे शिबिर नागरिकांच्या आरोग्यवृद्धीसाठी आणि समाजहितासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

              लालगुडा आणि परिसरातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad