वणी :-
वणी नगर परिषदेकडून नागरिकांवर लादण्यात आलेल्या मालमत्ता कर वाढीविरोधात भारतीय जनता पार्टी, वणी आक्रमक झाली आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयावर धडक देत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि करवाढीचा तीव्र निषेध नोंदवला.
🔥 भाजपची कठोर भूमिका :-
भाजपने थेट मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत स्पष्ट केले की,
- नागरिकांवर अन्यायकारक करवाढ लादणे अमान्य आहे.
- वाढीव कर तात्काळ रद्द किंवा स्थगित करावा.
- नगर परिषद निवडणुका (डिसेंबर-जानेवारी) पार पडेपर्यंत करवाढीवर स्थगिती कायम ठेवावी.
- नवीन नगर परिषद स्थापन झाल्यावरच पुढील निर्णय घेण्यात यावा.
भाजपने इशारा दिला की, जर नगर परिषदेकडून नागरिकांच्या भावनांचा आदर करण्यात आला नाही, तर पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल.
🔥 ठाम उपस्थिति – नेतृत्वाचा जाब :-
या निवेदनासाठी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची ठाम उपस्थिती लक्षणीय ठरली. त्यामध्ये श्री. संजीवरेड्डीजी बोदकुरवार (माजी आमदार, वणी),श्री. तारेंद्र बोरडे (माजी नगराध्यक्ष, वणी),श्री. रवीभाऊ बेलूरकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप, यवतमाळ),ॲड. कुणाल विजय चोरडिया (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप, यवतमाळ),ॲड. निलेशजी चोरडिया (अध्यक्ष, भाजप वणी),सौ. प्रीतिताई बिडकर (महिला अध्यक्ष, भाजप वणी)
तसेच भाजपचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून करवाढीविरोधात संताप व्यक्त करत होते.
🔥 भाजपचा इशारा – नागरिकांच्या हक्कांसाठी लढाई तीव्र होईल !
भाजपने स्पष्ट केले की, “सर्वसामान्यांवर अन्यायकारक ओझे टाकणाऱ्या नगर परिषदेला आम्ही मोकळे सोडणार नाही. नागरिकांच्या हितासाठी भाजप वणी कटिबद्ध आहे आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाची तीव्र लढाई उभारू.”

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या