Type Here to Get Search Results !

लाकडी काठ्या-लोखंडी रॉडने तरुणाला बेदम मारहाण; चंद्रपूरला हलविले

वणी : 

      शहरातील एकतानगर चौक येथे काल मध्यरात्री झालेल्या गोंधळात अंकुश कृष्णा उर्फ राम मोगरे (वय 24) या तरुणावर काही इसमांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास एकतानगर चौक, रॉयल पानठेला समोर अंकुश मोगरे याच्यावर काही इसमांनी वादातून हल्ला केला. यामध्ये तरुणांवर लाकडी काठ्यांनी मारहाण, लोखंडी रॉडने हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

             मारहाणीमुळे अंकुश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय दवाखाना, वणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी स्थिती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

             या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात कलम 109, 189 (1) (2)(3)(4), 190, 191(1) (2) (3) BNS अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुदाम आसोरे करीत आहेत.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad