Type Here to Get Search Results !

नंदिग्राम एक्सप्रेसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू

वणी : 

           नंदिग्राम एक्सप्रेस ही मुंबईवरून वणी येथे येत असताना आज दिनांक 17 जुलै रोजी सकाळी ११ ते ११:३० वाजता चिखलगाव ते नांदेपेरा रेल्वे गेट दरम्यान एका युवकाचा नंदिग्राम एक्सप्रेस समोर कटून मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेहाचा पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे नंदीग्राम एक्सप्रेस तब्बल अर्धा तास उभी करण्यात आली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर रेल्वे पुढे रवाना करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image