Type Here to Get Search Results !

वणी चे सुपुत्र डॉ. श्याम मुडे यांची पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड

वणी : 

           वणी चे सुपुत्र व लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. श्याम नारायण मुडे यांनी पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. भूविज्ञान विषयात डॉक्टरेट मिळविल्यानंतर त्यांनी याच महाविद्यालयात भूविज्ञान विभागात २००६ साली सहयोगी प्राध्यापक म्हणून सुरवात केली होती. त्यानंतर अथक परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आज प्राचार्यपदाला गवसणी घातली. त्या अगोदर त्यांनी काही वर्षे नागपूर आणि कोल्हापूर येथे अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम केले. देश विदेशातील भूविज्ञानाशी संबंधित विविध संस्थांसाठी पण त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच त्यांना भूविज्ञानाशी विषयाशी संबंधित संशोधनासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील विविध भागातून आलेले विद्यार्थी भूविज्ञान विषयात आपले संशोधन पूर्ण करत आहे. 

              वणीतील नगर परिषद शाळा क्रमांक १ मधून प्राथमिक शिक्षण, त्यानंतर जनता विद्यालय येथून विद्यालयीन शिक्षण, लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय येथून बारावी उत्तीर्ण झल्यानंतर श्याम यांनी भूविज्ञान सारख्या आगळ्यावेगळ्या विषयाकडे कल वळविला, आणि गुरुनानक महाविद्यालय बल्लारपूर येथून पदवी संपादन केली त्यानंतर नागपूर विद्यापीठातून पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून सुरवात केली. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आकाशाला गवसणी घालता येते हे श्याम यांनी आज सिद्ध केले. त्यांनी मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image