Type Here to Get Search Results !

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्धा अंतर्गत अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांना बि- बियाणे वाटप

 

प्रतिनिधि/कोरा (मंगेश राऊत) : 

                                           प्रकल्प संचालिका आत्मा वर्धा डॉ. नलिनी भोयर, तालुका कृषि अधिकारी समुद्रपूर हर्षदा खेकारे आणि मंडळ कृषि अधिकारी गिरड रामू धनविजय यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रपूर तालुक्यातील चापापूर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वर्धा अंतर्गत अनुसूचित प्रवर्गातील 10 शेतकऱ्यांना बि- बियाणे वाटप करण्यात आले. 

      प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट क्षेत्र विकास 2.0 अंतर्गत स्थापित सजीवमाती ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोरा येथील सभासदांना भाजीपाला  आणि चारा पिके बियाणे बाबत कृषि पर्यवेक्षक अनिल खरसे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेश चांदेवार, सजीवमाती एफपीओ चे अध्यक्ष अरविंद येवले यांनी मार्गदर्शन केले. रशीद गजभे, मंगेश राऊत आणि चापापूर गावातील शेतकरी बांधवानी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad