Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले वाचनालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन संपन्न

वणी : 

        शहरातील सुप्रसिद्ध क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी वणी येथे प्रजासत्ताक दिन ठिक सकाळी ०७:३० वाजता वाचनालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

      वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला, यानंतर लगेचच राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

वाचनालयाचे कोषाध्यक्ष अशोक चौधरी यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत सादर केले. प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून प्रजेची सत्ता स्थापन केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं. 

      १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. तसेच प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. 

    त्यामुळे प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यघटनेने घालून दिलेले आदर्श व मूल्य यांच्याप्रती असलेली आपली बांधिलकी प्रत्येक नागरिकांनी आणखी दृढ केली पाहिजे, असे आवाहन आपल्या भाषणातून केले. 

    यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सावित्रीबाई फुले वाचनालयाचे पदाधिकारी व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे कोषाध्यक्ष अशोक चौधरी, सूत्रसंचालन सचिव प्रा. विजय बोबडे तर उपस्थितांचे आभार सहसचिव गजेंद्र भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad