Type Here to Get Search Results !

विद्यार्थी गौरव व समाज मेळावा :तिरळे कुणबी वणी तालुका संघटनेचे आयोजन

वणी : 

         तिरळे कुणबी समाज संघटना, तालुका वणी च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे आयोजन, शनिवार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी धनोजे कुणबी समाज भवन (साधनकरवाडी, वणी) येथे सकाळी 10:30 वाजता करण्यात आले आहे. 

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी व ति.कु.समाज वणी चे माजी अध्यक्ष डॉ. शांतारामजी ठाकरे राहणार असून  ति.कु.समाज भद्रावतीचे उपाध्यक्ष वसंतराव मानकर, प्राचार्य प्रशांत गोडे, जेष्ठ समाजसेविका निलीमाताई काळे व ति.कु.समाज वणी चे संस्थापक डॉ. मोरेश्वर महाजन, डॉ. अंकिता इंगोले (शिरकांडे) आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

         समाज संघटनेच्या वतीने वणी तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, समाज भूषण पुरस्कार तसेच सामाजिक, सांस्कृतिक कृषी व व्यवसायिक क्षेत्रात समाजपयोगी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी वणी तालुक्यातील सर्व सन्माननीय समाज बांधवांनी या समाज मेळाव्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन ति.कु.समाज‌ वणी तालुक्याचे अध्यक्ष कार्तिक देवडे, सचिव अशोकराव चौधरी व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad