Type Here to Get Search Results !

नेचर फाउंडेशन अभ्यासिका शिकवणी वर्गातील दोन विद्यार्थ्यांची कनिष्ठ लिपिक पदी निवड

प्रतिनिधि/मंगेश राऊत : 

                         चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओढ लावण्याकरिता विद्यार्थ्यांना पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद यासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास करणे शक्य होत नसल्यामुळे नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली. या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गसोबतच अभ्यासिका सुद्धा चालवण्यात येते.

   याच अभ्यासिकेच्या व शिकवणी वर्गाच्या माध्यमातून प्रशांत सातपुते चिमूर व राणी चौधरी मू.कळमगाव ता. चिमूर या विद्यार्थ्यांची जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदी नेचर फाउंडेशन शिकवणी वर्ग व अभ्यासिकेच्या माध्यमातून मिळवली. राणी ही ऐका शेतकऱ्याची मुलगी आहे. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असताना स्पर्धा परीक्षांच्या नेचर फाउंडेशन माध्यमातून चिमूर पुणे व नागपूर असा प्रवास तिने केला दोन वेळा अपयश आल्यानंतर शेवटी यश मात्र मिळविले. नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून चिमूर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात तीन महिने मोफत शिकवणी वर्ग चालविण्यात येते. या व्यतिरिक्त लोकल टू ग्लोबल केजी टू पीजी या माध्यमातून ग्रामीण भागातील दलित आदिवासी मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये सुद्धा पाठवण्याचे काम नेचर फाउंडेशन करीत आहेत.

         यावेळी राणी चौधरी ने सांगितले की, 'यश अपयश हे जीवनाचे दोन पैलू आहेत इथे संयम ठेवतो तोच टिकुन राहतो.' तर प्रशांत सातपुते यांनी यशाची पायरी चढण्यासाठी खूप समस्या येत असतात पण स्वतःलाच स्वतःचा आधार होऊन स्वतःला पुढें ढकलायच असत अशी प्रतिक्रिया दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad